राज ठाकरे ठाण्यात राजकीय घडामोडींवर तोफ डागणार, बघा मनसे वर्धापन दिनाची तयारी

| Updated on: Mar 09, 2023 | 2:59 PM

VIDEO | आगामी निवडणुकांसदर्भात राज ठाकरे आज ठाण्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार, काय बोलणार राज ठाकरे?

ठाणे : मनसेचा आज ९ मार्च रोजी १७ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात केला जात आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. संपूर्ण ठाण्यात ठिकठिकाणी सभेच्या पार्श्वभूमीवर साहेब असे फलक लावून मनसेनं राज ठाकरे यांच्या सभेची पूर्ण वातावरण निर्मिती केली आहे. तसेच सभेच्या निमित्ताने मनसेची ताकद दाखवण्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. दरम्यान, नव्या दमाने नव्या आयुधांसह नवनिर्माणासह मनसे सज्ज झाली असून मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन सोहळा होत आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये हा कार्यक्रम होणार असून सध्याची राजकीय परिस्थिती आणि शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यावर राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 09, 2023 02:59 PM
शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची : दीपक केसरकर
पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा, एसटी प्रवासात 50 टक्के सूट आणि लवकरच…