ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?

| Updated on: Nov 28, 2024 | 10:28 AM

यंदाच्या विधानसभेचा निकाल हा बहुसंख्य लोकांना धक्का देणारा असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी ईव्हीएमला दोषी ठरवलंय. त्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडी पाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली आहे. यंदाच्या विधानसभेचा निकाल हा बहुसंख्य लोकांना धक्का देणारा असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी ईव्हीएमला दोषी ठरवलंय. त्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे पोस्टल मतांच्या आकडेवारी टाकून मतांच्या आकडेवारीवरून सवाल केले आहेत. तर ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीच्या सूरात मनसेचा सूर मिसळवलाय. ईव्हीएमच्या संशयावर बोट ठेवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोस्टल आणि ईव्हीएमच्या मतांवर बोट ठेवलं आहे. महायुतीमध्ये भाजपचे १४९ पैकी पोस्टल मतांमध्ये ८४ उमेदवार आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांचे २० तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ५९ पैकी २४ उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे १०१ जागांपैकी ५६ उमेदवार पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे ९५ पैकी ३६ तर शरद पवार यांचे ८६ पैकी ४० उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, पोस्टल आणि ईव्हीएम मतांचा ट्रेंड बदलत नसल्याचा दावा करत मविआने २०१९ ची विधानसभा आणि गेल्या लोकसभेचे आकडे ट्विट करत सवाल केले आहेत.

Published on: Nov 28, 2024 10:28 AM
‘आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापांमुळे…,’ शिवसेना आमदाराची खोचक टीका
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला अन् म्हणाले…