‘राज ठाकरे १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच धनुष्यबाणाला आपले मत देणार’, राहुल शेवाळे काय म्हणाले?

| Updated on: Apr 19, 2024 | 5:35 PM

मुंबई दक्षिण मध्यमधून महायुतीकडून राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत. तर मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास १८ वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, असे राहुल शेवाळे म्हणाले तर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार याचा आनंद आणि...

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट घेतली. यावेळी आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, मुंबई दक्षिण मध्यमधून महायुतीकडून राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत. तर मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास १८ वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, असे राहुल शेवाळे म्हणाले तर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार याचा आनंद आणि ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले. मनसेच्या ८० हजार मतांचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचा विश्वासही शेवाळेंनी व्यक्त केला. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राहुल शेवाळेंनी अशी प्रतिक्रिया दिली. तसेच १७ मे च्या महायुतीच्या सभेत राज सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील, असेही शेवाळेंनी म्हटले.

Published on: Apr 19, 2024 05:35 PM
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय…राऊत आणि जयंत पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट, खोकेसम्राट, पलटीसम्राट आणि…; कुणी केली जहरी टीका?