‘त्या’ निवडणुकीची आठवण करून देत राज ठाकरे यांचं ‘मविआ’ला पत्र, म्हणाले….

| Updated on: Feb 05, 2023 | 11:27 AM

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? राज ठाकरे यांनी काय म्हटलंय पत्रात?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून पोटनिवडणुकीसाठी ते मनसेचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही करून दिली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी दिलेला सल्ला महाविकास आघाडी मानणार का? आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भाजपने दाखवला तोच मविआच्या नेत्यांनी दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे, हे देशाला दाखवून देण्याची संधी सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा’ असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.

Published on: Feb 05, 2023 11:17 AM
कसबापेठ, चिंचवडची पोटनिवडणूक होणारच; संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
संजय राऊत यांनी भाजपला करून दिली ‘त्या’ पोटनिवडणुकीची आठवण, म्हणाले ती परंपरा