पक्षातील रिकामटेकडे नेते टार्गेट करण्याचं काम करतात : रुपाली पाटील
मनसेच्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत दोन गट पडल्याची चर्चाही केली जातेय.
मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय नाही.परंतु पक्षातील रिकामटेकड्या मंडळींचा होत असलेला त्रास, मला नवीन पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो. जवळचे हितचिंतकच माझ्याविरोधात पक्ष प्रमुखांचे कान भरून लागल्याचा आरोप मनसे पुण्याच्या शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. मनसेच्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत दोन गट पडल्याची चर्चाही केली जातेय.