माहीमचे अनधिकृत बांधकाम हटवल्यावर संदीप देशपांडे म्हणाले, ‘त्याकडे दुर्लक्ष केलं की…’,
VIDEO | माहिमच्या खाडीतील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे म्हणाले...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात माहीमच्या खाडीत नवीन हाजी अली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी महिन्याभराचा अल्टिमेटम दिला असताना त्याआधीच पालिकेकडून कारवाई करून अनधिकृत बांधकामावर तोडकामाची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी संदीप देशापंडे म्हणाले, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला कोणत्याही प्रकारे थारा द्यायला नको, प्रशासनाने ज्या तत्परतेने कारवाई केली, आम्ही त्यांचं अभिनंदन करू, पण गेल्या दोन वर्षांत ज्याप्रकारे अक्षम्यरित्या या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. महाविकास आघाडी काळात याकडे दुर्लक्ष झालं की जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष केलं की त्यांना दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आलं हा सगळा संशोधनाचा विषय आहे, असेही संदीप देशपांडे म्हणाले.