‘ईदचं लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर तुम्ही…’, मनसे नेत्याचा उद्धव ठाकरे गटावर थेट हल्लाबोल

| Updated on: Nov 01, 2024 | 1:00 PM

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेच्या दिपोत्सवाविरोधात तक्रार दाखल केलीये. यावरच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. बघा व्हिडीओ...

Follow us on

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादर शिवाजीपार्कमध्ये दिपावलीच्या निमित्ताने भव्य रोषणाई केली जाते. यंदाही शिवाजी पार्कमध्ये दिपावलीच्या निमित्ताने रोषणाई करण्यात आली आहे. मनसेचा हा दिपोत्सव पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी तरूणाई मोठी गर्दी करत असते. अशातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून मनसेच्या दिपोत्सवावर आक्षेप घेण्यात आलाय. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे खासदार अनिल देसाई यांनी दिपोत्सव साजरा करण्यासाठी मनसेने पालिकेकडून नियमबाह्य परवानगी घेतली असा आरोप केलाय. यावर मनसेकडून उबाठाला थेट उत्तर देण्यात आलंय. उद्धव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध असल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय. मूळात उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? असा थेट सवालच संदीप देशपांडे यांनी केलाय.