पालिकेत 100 टक्के मनसे सत्तेत येणार, राज ठाकरे यांच्यानंतर मनसेच्या ‘या’ नेत्याचा विश्वास
'महानगर पालिकेत 100 टक्के मनसे सत्तेत येणार यासाठी आम्हाला कुठल्याही आघाडी युतीची...', नेमका काय व्यक्त केला विश्वास
ठाणे : महानगर पालिकेत 100 टक्के मनसे सत्तेत येणार यासाठी आम्हाला कुठल्याही आघाडी युतीची गरज नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. तर आमचा आणि जनतेचा संपूर्ण विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर असल्याचेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. “पक्ष चालवताना त्रास होतो. आज भाजप सत्तेवर दिसतो, पण त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. 2014 ला बहुमत हाती आलं. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल”, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न केला. तर मी नुसती आशा दाखवत नाही. महापालिका जिंकायच्या आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. मनसेच्या वर्धापन दिनाचा सोहळा पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
Published on: Mar 10, 2023 08:31 AM