Pune Loksabha : पुण्यात वसंत मोरे यांना टफ फाईट मिळणार? ‘हा’ नेताही लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार
VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू, अशातच मनसे पक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून वसंत मोरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र आता त्यांना टफ फाईट मिळणार आहे.
पुणे, २० ऑक्टोबर २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. तर कोणत्या पक्षाकडून कोणाला निवडणुकीस उमेदवारी द्यायला हवी, याची गणितं देखील काही राजकीय पक्षांकडून बांधण्यास सुरूवात झाली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीची तयारी मनसे पक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही सुरू करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून वसंत मोरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र आता त्यांना टफ फाईट मिळणार आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली. पुणे लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे, यात कोणतीही शंका नाही. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार कोण असेल हे राज ठाकरे ठरवतील. पक्षाने आणि राज ठाकरे यांनी मला संधी दिली तर मी नक्की लोकसभा निवडणूक लढवणार आहे. इच्छा बोलून दाखवण्यापेक्षा राज ठाकरे म्हणाले तर माझी स्वत:ची पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. साहेबांनी लढ म्हटल्यावर मी नक्की लढणार असल्याचेही साईनाथ बाबर यांनी म्हटले आहे.