राज ठाकरेंवर टीका अन् कार्यकर्त्यांचा संताप अनावर; मिटकरींवर ॲसिड हल्ला अन् कारची तोडफोड

| Updated on: Jul 31, 2024 | 10:45 AM

अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यांची गाडीच फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला त्यावेळी अमोल मिटकरी गाडीत नव्हते तर ते विश्रामगृहात थांबले होते. मात्र हा हल्ला झाल्यानंतर...

Follow us on

अजित पवार यांच्या एका आमदारानं राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हटलं. यानंतर ३० जुलै रोजी त्यांचा गाडीवर हल्ला करण्यात आला. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यांची गाडीच फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला त्यावेळी अमोल मिटकरी गाडीत नव्हते तर ते विश्रामगृहात थांबले होते. मात्र हा हल्ला झाल्यानंतर मनसेच्या गुंडाकडून चाकू आणि अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप मिटकरी यांनी केलाय. पण ज्या ठिकाणी मिटकरी होते. त्या ठिकाणी मनसेचे आक्रमक कार्यकर्ते पाहून पोलिसांनी दार लावलं आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर का म्हटलं आणि प्रकरण तोडफोडीपर्यंत का आलं? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट