अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार? राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांची मागणी काय?

| Updated on: Sep 18, 2024 | 3:27 PM

ठाकरे घराण्यातील आणखी एक युवा नेता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. हा युवा नेता अमित ठाकरे असीन त्याने स्वत: मनसेच्या एका बैठकीत आपली इच्छा व्यक्त केली. मनसे नेत्यांची राजगडवर बैठक झाली. या बैठकीत अमित ठाकरेंनी स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Follow us on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मोठी शक्यता आहे. अमित ठाकरे यांच्याकडून स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून सर्वच नेत्यांनीही विधानसभा निवडणूक लढवावी, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. असे असताना आता अमित ठाकरे यांना दिंडोशी विधानसभेतून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताच त्यांना मनसे पक्षातून कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. गेल्या १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली होती. अमित ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्या या बैठकीत आपली निवडणुकीसंदर्भात भूमिका व्यक्त केली. दरम्यान, अमित ठाकरे हे माहीम, भांडूप किंवा मागाठाणे यापैकी एका जागेवरून विधानसभा लढवण्याची शक्यता आहे.