Special Report | मनसेची लोकप्रियता कायम, पण मतांची टक्केवारी वाढेना
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली.
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही. निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनतेचा मतपेटीतून राग व्यक्त होत नाही, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाही हाच मुद्दा उपस्थित केला होता. तोच धागा पकडून राज म्हणाले की, आजही नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले असे म्हटले जाते. असा विकास झाला नाही, असा उल्लेख केला जातो. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी सल त्यांनी व्यक्त केली.