Kangana Ranaut | पंजाबच्या किरतपूरमध्ये शेतकऱ्यांनी घातला कंगना रनौतच्या गाडीला घेराव

| Updated on: Dec 03, 2021 | 5:15 PM

सातत्याने वादात सापडणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ताफ्यावर पंजाबमध्ये हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांनी कंगनाचा ताफा अडवला आणि तिने माफी मागावी अशी मागणी सुरू केली.

सातत्याने वादात सापडणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ताफ्यावर पंजाबमध्ये हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांनी कंगनाचा ताफा अडवला आणि तिने माफी मागावी अशी मागणी सुरू केली. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे पंजाबमधील शेतकरी संतप्त झाले होते. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या घटनेचा संदर्भ देत कंगनाने सांगितले की, आंदोलकांनी तिच्या कारला घेराव घातला, त्यामुळे ती बराच वेळ तिथे अडकली होती. कंगनाने सांगितले की, हिमाचल सोडल्यानंतर मी पंजाबमध्ये प्रवेश करताच जमावाने मला घेरले आणि स्वत:ला शेतकरी म्हणवणाऱ्या लोकांनी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. (Mob attacks Kangana Ranaut’s car in Punjab)

Pune | पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी केली अटक
BJP सोबत जाण्याबाबत चर्चा, मात्र स्वबळावर निवडणुका लढवाव्यात; पदाधिकाऱ्यांची भावना : Sandep Deshpande