Special Report | Budget 2022 : काय स्वस्त, काय महागलं?

| Updated on: Feb 01, 2022 | 11:19 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ( Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशा आली आहे. या शिवाय कृषी क्षेत्रावर या अर्थसंकल्पात विशेष फोकस करण्यात आला असून त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. या शिवाय कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर हेल्थ सेक्टरवरही या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.

पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अजित पवारांशी बैठक झाल्याचा शहराध्यक्षांचा दावा
Budget 2022: अजित पवार म्हणतात, महाराष्ट्राच्या वाट्याला काय हे सापडणे कठिण