Modi 3.0 Cabinet : मंत्रिमंडळातून ‘या’ दोन बड्या मंत्र्यांना वगळलं, भाजप हायकमांडकडून संपर्कच नाही

| Updated on: Jun 09, 2024 | 3:56 PM

नव्या मोदी कॅबिनेटमध्ये दोन बड्या मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. मोदी कॅबिनेटमध्ये नारायण राणे आणि भागवत कराड यांना स्थान देण्यात आले नाही. महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश असल्याची माहिती मिळतेय.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तारही आज होणार आहे. साधारण ४० नेते नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र असे असले तरी नव्या मोदी कॅबिनेटमध्ये दोन बड्या मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. मोदी कॅबिनेटमध्ये नारायण राणे आणि भागवत कराड यांना स्थान देण्यात आले नाही. भाजप हायकमांडकडून नारायण राणे आणि भागवत कराड यांना कोणताच संपर्क करण्यात आला नाही. याचा अर्थ त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर मंत्री भागवत कराड अर्थ राज्यमंत्री होते. पंरतू यंदा या दोघांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आले नसल्याचे कळतेय. दुसरीकडे महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Jun 09, 2024 03:56 PM
Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांवर भाजपकडून दबाव, रोहित पवारांचा मोठा दावा काय?
बापरे खतरनाक… एकाच रनवे वर दोन विमानं, एकाचं लँडींग अन् दुसऱ्याचं टेक ऑफ; नेमकं झालं काय? बघा VIDEO