Modi 3.0 Cabinet : मोदींचा 100 दिवसांचा मेगा प्लान रेडी, नव्या कॅबिनेटमधील सहकाऱ्यांना दिलं डायरेक्शन
नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य सहकाऱ्यांना बैठकीत सूचना देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक नुकतीच संपली आहे. या बैठकीत मोदींनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काही सूचना दिल्यात, बघा व्हिडीओ
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आज 9 जून रोजी पंतप्रधानपदाची मोदी शपथ घेणार असून त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य सहकाऱ्यांना बैठकीत सूचना देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक नुकतीच संपली आहे. या बैठकीत मोदींनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काही सूचना दिल्या आहेत. या बैठकीत मोदी नेमकं काय म्हणाले, १०० दिवसांचा कृती आरखडा जमिनीवर राबवावा लागेल. जो विभाग मिळेल त्यातील प्रलंबित योजना पूर्ण करा, पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार करा, २०४७ साली भारताला विकसित भारत बनवण्याचे आमच्या सरकारचे ध्येय आहे. लोकांचा एनडीएवर विश्वास आहे. तो मजबूत कऱणे आवश्यक असल्याचे मोदींनी या बैठकीत म्हटले आहे.
Published on: Jun 09, 2024 02:17 PM