Modi 3.0 Govt : NDA चं सरकार पण मोदींची डोकेदुखी वाढणार? नीतिश कुमार-चंद्रबाबूंची मागणी फार

| Updated on: Jun 07, 2024 | 10:24 AM

१६ खासदार असणार चंद्रबाबू नायडू आणि १२ खासदार असणारे नीतिश कुमार यांनी मोदींना साथ द्यायचं ठरवलं आता मंत्रिमंडळावरून खलबतं सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. बघा कोणाला काय मिळणार?

नीतिश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता एनडीचं सरकार स्थापन होणार आहे. तर इंडिया आघाडी विरोधात बसणार आहे. मात्र नीतिश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची मागणीही तितकीच तगडी आहे. महत्त्वाच्या खात्यांसह नेमकी काय काय मागणी आहे? १६ खासदार असणार चंद्रबाबू नायडू आणि १२ खासदार असणारे नीतिश कुमार यांनी मोदींना साथ द्यायचं ठरवलं आता मंत्रिमंडळावरून खलबतं सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार आहेत. फॉर्म्युल्यानुसार चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला ३ कॅबिनेट मंत्रिपदं, नीतिश कुमार यांच्या जेडीयूला २ कॅबिनेट मंत्रिपदं, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एक कॅबिनेट, बिहारच्या हिंदुस्थान आवाम या पक्षाला १ कॅबिनेट तर महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवेसनेला १ कॅबिनेट १ राज्यमंत्री पद, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला, अपना दल पक्षासह आरएलडी पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार आहे.

Published on: Jun 07, 2024 10:24 AM
Kangana Ranaut : नुकतीच झाली खासदार अन् हे काय घडलं… कंगणा रणावतच्या कुणी लगावली कानाखाली?
Beed Lok Sabha Election Result 2024 : पंकजा मुंडेंचा निसटता पराभव नेमका कशामुळे? काय आहेत कारणं?