Modi 3.0 Cabinet : दिल्ली कुणावर मेहेरबान? कुणाला लागली लॉटरी, मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी तर कुणाचा पत्ता कट?

| Updated on: Jun 10, 2024 | 11:07 AM

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानतंर एनडीएच्या मित्रपक्षासह नव्या सरकारची सुरूवात झाली महाराष्ट्रातून दिल्लीत २०१९ ला कोणते मंत्री होते, यंदा त्यात कोणता बदल झाला? तर देशातील कोणते २० बडे नेते यंदा मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानतंर एनडीएच्या मित्रपक्षासह नव्या सरकारची सुरूवात झाली आहे. मात्र गेल्या टर्म मधले २० चेहरे यंदा मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. नारायण राणे यांचा विजय झाला पण मंत्रिपदासाठी संधी नाही. रावसाहेब दानवे गेल्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र यंदा पराभूत झाल्याने संधी नाही. कपिल पाटील हे पंचायत राज्यमंत्री होते. मात्र पराभूत झाल्याने मंत्रिमंडळात स्थान नाही. राज्यसभेतून मंत्री झालेले भागवत कराड अर्थराज्यमंत्री झाले पण यंदा त्यांना संधी मिळाली नाही आणि भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होते मात्र यंदा पराभव झाल्याने मंत्रिमंडळात संधी नाही. महाराष्ट्रातून दिल्लीत २०१९ ला कोणते मंत्री होते, यंदा त्यात कोणता बदल झाला? तर देशातील कोणते २० बडे नेते यंदा मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 10, 2024 11:07 AM
विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना… जरांगे पाटलांचा इशारा काय?
Modi 3.0 Cabinet : पंतप्रधान मोदींचं 3.O कॅबिनेट कसं असणार? कोणत्या दिग्गजांनी घेतली शपथ?