Bangladesh Crisis : शेख हसीनांना कुणी घर देतं का घर? आश्रय देण्यास अमेरिका-ब्रिटननं झटकले हात
शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात अराजकता पसरली आहे. अजूनही बांगलादेशातील हिंसाचार थांबण्याचं काही नाव दिसत नाही. 20 वर्ष एखाद्या महाराणीप्रमाणे कारभार करणाऱ्या शेख हसीनांकडे आता स्वतःच्या ठाव ठिकाण्याचा पत्ता नाही. अमेरिकेनंतर ब्रिटनने सुद्धा आश्रय देण्यास हात झटकले आहेत.
बांगलादेशातील संसदेत दंगलखोरांनी कब्जा मिळवल्यानंतर संसदेची स्थिती काहिशी भयावह होती. कुणी छतावर, कुणी आवारातील पाण्यात तर कुणी संसदेत घुसखोरी करून तोडफोड करत होतं. अनेक भागात हिंसक जमाव मोठ्या प्रमाणात होता. त्यांना रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोलिसांच्या संख्याबळापेक्षा तुलनेनं अगदीच नगण्य होतं. पोलिसांच्या तुकडीवर देखील आक्रमक जमावाने हल्ला केला. त्यापैकी काही पोलिसांची सुटका करून त्यांना मार्ग करून देत असताना पाच ते सहा वर्षाचा मुलाकडून देखील पोलिसांवर हात उगारला जात असल्याचे पाहायला मिळाले. गोळीबार, जाळपोळ आणि होणाऱ्या नासधुसीमुळे अनेक बांगलादेशी भारतात येण्याचा प्रयत्न करताना दिसले. तिकडे बांगलादेशात मोहम्मद युनुस यांनी हंगामी प्रमुख बनण्यास होकार दिला. मोहम्मद युनुस यांना शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसह शेख हसीना यांचे कट्टर विरोधक म्हणून मोहम्मद युनुस यांना ओळखलं जातंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट