Mohan Bhagwat | शिवऋषी, शतायुषी आमच्यातून गेला, बाबासाहेबांच्या निधनानंतर सरसंघचालकांची प्रतिक्रिया
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर शिवऋषी, शतायुषी आमच्यातून गेला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी दिली आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यानंतर, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. दरम्यान, शिवऋषी, शतायुषी आमच्यातून गेला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी दिली आहे.
Published on: Nov 15, 2021 03:50 PM