Mohit Kamboj | नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, माझगाव कोर्टात दाखल
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोप करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांचा मेहुणा वृषभ सचदेवा याला सोडून देण्यात आल्याचा दावा केला होता. त्या आरोपावरुन आता मोहित भारतीय यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबईच्या माझगाव कोर्टात हा दावा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या कुटुंबियांविषयी […]
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोप करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांचा मेहुणा वृषभ सचदेवा याला सोडून देण्यात आल्याचा दावा केला होता. त्या आरोपावरुन आता मोहित भारतीय यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबईच्या माझगाव कोर्टात हा दावा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं.
माझ्या कुटुंबियांविषयी आणि माझ्याविषयी खोटे आरोप ते करत आहेत. त्याविरोधात आम्ही नोटीस पाठवल्या होत्या. त्याला उत्तर दिलं नाही. त्यामुळे आम्ही क्रिमिनल डिफरमिशन दाखल केलं असल्याचं मोहित भारतीय म्हणाले. तसंच येणाऱ्या काळात सिव्हिल डिफरमिशन दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवाब मलिक हे पदाचा आणि सरकारी यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही भारतीय यांनी केलाय.
नवाब मलिकांचा आरोप काय होता?
भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केला होता. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. यावेळी वृषभ सचदेवाचे वडील होते. अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केली होती.