आम्ही Raj Thackeray यांच्या पाठिशी - Mohit Kamboj

आम्ही Raj Thackeray यांच्या पाठिशी – Mohit Kamboj

| Updated on: Apr 03, 2022 | 8:29 PM

लोकांच्या तक्रारी आल्यानंतर ते घेऊन आम्ही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी करणार आहोत. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी उचलेला मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही या मुद्द्यावर राज साहेबांसोबत आहोत, असे मोहित कंबोज यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मशिदीवरील अनधिकृत लाऊडस्पीकर विरोधात भाजपा नेते मोहित कंबोज लवकरच मुंबई हायकोर्टात जाणार आहेत. आम्ही कुठल्याही धर्म किंवा जे काही कायदेशीर आहे त्यांच्या विरोधात नाही. आम्ही या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे. मात्र जे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे त्याच्या विरोधात आहोत. अनधिकृत भोंगाविरोधात आम्ही सर्वसामान्य लोकांना तक्रार करण्याचे आव्हान केले आहे. लोकांच्या तक्रारी आल्यानंतर ते घेऊन आम्ही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी करणार आहोत. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी उचलेला मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही या मुद्द्यावर राज साहेबांसोबत आहोत, असे मोहित कंबोज यांनी स्पष्ट केले.

Nashik जवळील देवळाली ते लहवीतदरम्यान Pawan Express चे 11 डब्बे रुळावरुन घसरले
Special Report | Raj Thackeray यांच्या आदेशानंतर भोंग्यावरुन मनसैनिक आक्रमक -Tv9