Bhavana Gawali | भावना गवळी ईडी चौकशी प्रकरण; 3 कोटी 58 लाखांची मनी लॉंड्रिंग झाल्याचं उघड
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात काही महिन्या पूर्वी मनी लाँड्रिंगचा गुन्हा ईडीने दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्यांचे सहकारी सईद खान हा देखील आरोपी आहे. यामुळे त्याला 27 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असून हा गुन्हा ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. या गुन्ह्यातील सुमारे 3 कोटी 58 लाख रुपयांची मनी लाँड्रिंग झाल्याचं उघडकीस आलं आहे. ही मनी लाँड्रिंग हवाला मार्फत झाली असल्याच ईडीच्या सूत्रांच म्हणणं आहे. हे पुरावे ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केले आहेत. याच पुराव्या मुळे भावना गवळी यांचे जवळचे साथीदार सईद खान यांच्या जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात काही महिन्या पूर्वी मनी लाँड्रिंगचा गुन्हा ईडीने दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्यांचे सहकारी सईद खान हा देखील आरोपी आहे. यामुळे त्याला 27 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तेव्हा पासून तो जेलमध्ये आहे.