ह्दयद्रावक! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर होतेय माकडांची दैना, अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ

| Updated on: Aug 14, 2023 | 4:05 PM

VIDEO | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील डोंगर कपारीत राहणाऱ्या माकडांचा पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात, अपघात अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ आणि ऊन वारा आणि पावसाने या माकडांची दैना

Follow us on

लोणावळा, पुणे : १४ ऑगस्ट २०२३ | पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर घाटमाथा असल्याने येथे अनेक माकडांच्या प्रजाती आढळून येतात. मात्र ऊन वारा आणि पावसाने या माकडांची दैना उडते. डोंगर कपारीत राहणाऱ्या या माकडांचा पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात होतो, त्यामुळे जखमी माकडाचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न खंडाळा बोरघाटात अपघातांच्या मदतीसाठी असणारी रेस्कु टीम करत असते. अगदी मनुष्यप्रमाणे जखमी माकडांना उचलून प्रथमउपचार करून रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. असंच चार दिवसांपासून निपचित पडलेल्या एका माकडाच्या पिल्लाला जीवदान देऊन रेस्कु करण्यात प्राणिमित्रांना यश आलंय, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे प्राणिमित्रांकडून सांगण्यात येत आहे.