Special Report | सोशल मीडियावर Monkey Vs Dog ट्रेंड
बीडमधील एका गावात मागील चार महिन्यांपासून माकडांनी धुमाकूळ घातला होता. या माकडांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लाला मारले आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी माकडांचे आणि कुत्र्यांचे जणू टोळीयुद्ध सुरू आहे.
बीडमधील एका गावात मागील चार महिन्यांपासून माकडांनी धुमाकूळ घातला होता. या माकडांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लाला मारले आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी माकडांचे आणि कुत्र्यांचे जणू टोळीयुद्ध सुरू आहे. या टोळीयुद्धाची देशभर चर्चा सुरू आहे. यात माकडांनी कुत्र्यांच्या पिल्लांना उंच ठिकाणी नेऊन वरतून खाली फेकले आहे. यामुळे या परिसरात कुत्री दिसेना झाली आहे. इतिहासातल्या या सर्वात मोठ्या बदल्याची सुरूवात झाली, एका वाईट घटनेने. आधी कुत्र्यांच्या एका टोळीने माकडांच्या एका पिल्लाला मारले, त्यानंतर माकडांनीही बदला घ्यायचा ठरवला आणि त्याच बदल्यातून त्यांनी तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिल्लांना मारले आहे. त्यानंतर गावातही दहशतीचे वातावरण पसरले होते. पहिल्यांदा वनविभागाने प्रयत्न करूनही त्यांना माकडांना पकडण्यात यश आले नव्हते मात्र, आता काही माकडांना पकडण्यात यश आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.