Special Report | बीडमध्ये लऊळ गावात वानरांची दहशत
वानराच्या दहशतीमुळे बीड जिल्ह्यातील लऊळ हे गाव सध्या चर्चेचा केंद्रबिंदूक्स बनला आहे. चार महिन्यापूर्वी गावात दोन वानर आले. वानरांनी कुत्र्यांच्या पिलांना गोंजारण्यास सुरुवात केली. कुत्र्यांच्या पिलांना वानर उचलून इमारतीच्या छतावर ठेवतात.
बीड : वानराच्या दहशतीमुळे बीड जिल्ह्यातील लऊळ हे गाव सध्या चर्चेचा केंद्रबिंदूक्स बनला आहे. चार महिन्यापूर्वी गावात दोन वानर आले. वानरांनी कुत्र्यांच्या पिलांना गोंजारण्यास सुरुवात केली. कुत्र्यांच्या पिलांना वानर उचलून इमारतीच्या छतावर ठेवतात. तिथे अन्न पाणी मिळत नसल्याने चार महिन्यात तब्बल 40 ते 50 कुत्र्यांच्या पिलांचा भूक बळीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वानरांच्या हातातील हे कुत्र्याचं पिल्लू पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असेल. मात्र हे सत्य आहे. माजलगाव तालुक्यातील लऊळ या गावात चार महिन्यापूर्वी दोन वानर दाखल झाले. वानरांनी कुत्र्यांच्या लहान पिलांना घेऊन कुरवाळने सुरू केले. मात्र नागरिकांच्या भीतीपोटी वानर कुत्र्यांच्या पिलांना घेऊन इमारतीच्या छतावर गेले. तिथे अन्न पाणी नसल्याने कुत्र्यांच्या पिलांचे भूकबळीने मृत्यू झाल्याचे ग्रामस्थ संगतायेत.