Monsoon Session : “भाजपला विधान सभेत गुंडगिरी करायची असेल तर…”-Nawab Malik

| Updated on: Jul 05, 2021 | 10:18 PM

कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू, अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले आहे. त्या बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. मात्र, कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू, अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय.