Monsoon ट्रिपसाठी लोणावळ्याला जाताय? हा व्हिडीओ नक्की बघा, भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 02, 2024 | 12:44 PM

लोणावळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाचे पर्यटन स्थळी सुरक्षाविषयक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर आणि इंदापुर इत्यादी तालुक्यातील डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव आदी परिसरात कडक नियमावली तयार करण्यात येणार आहे.

मान्सून सुरु होताच पर्यटक पर्यटनस्थळाला भेट देण्याचं नियोजन करतात. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पर्यटनस्थळावर सुरु होते. तर काही धोकादायक पर्यटन स्थळांवर काही पर्यटकांकडून जीववर उदार होऊन धाडस केले जाते. त्यामुळे दुर्घटनांचे प्रकारही मोठ्याप्रमाणावर घडताना दिसताय. ताजी घटना म्हणजे भुशी डॅम परिसरात असणाऱ्या धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अन्सारी कुटुंब आलं होतं. यावेळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धबधबा असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या दुर्घटनेनंतर प्रशासन जागं झाले आहे. त्यांनी काही ठिकाणी तातडीने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. लोणावळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाचे पर्यटन स्थळी सुरक्षाविषयक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर आणि इंदापुर इत्यादी तालुक्यातील डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव आदी परिसरात कडक नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी सायंकाळी 6 नंतर बंदी असणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहे.

Published on: Jul 02, 2024 12:44 PM
प्रवास करताना सावधान… सिंहगड घाट रस्त्यावर दरडीसोबत कोसळला 6 टनाचा भलामोठा दगड अन्…
Maharashtra Rain Forecast : मुंबईसह ‘या’ भागात ‘कोसळधार’, महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?