Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन बाबत मोठी बातमी, दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? नेमकं काय घडलं?

| Updated on: Dec 18, 2023 | 10:32 AM

दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या दाव्यात असेही म्हटले आहे की, दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटचा आरोपी असलेला दाऊद अनेक वर्षांपासून कराचीमध्ये राहत आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे.

Published on: Dec 18, 2023 10:32 AM
… ‘ते’ आदेश का दिले? मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर यांचा फडणवीस यांना थेट सवाल
भाजपची ‘जान’ अदानींच्या पोपटात? धारावीचा लढ्यावरून सामनातून रोखठोक सवाल