अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम शेवटच्या घटका मोजतोय?, कुणी दिलं विष?; बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Dec 18, 2023 | 10:05 PM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमींने केलाय. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील सूत्रधार मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याचा मोठा दावा

मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : पाकिस्तानात दाऊदला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमींने केलाय. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील सूत्रधार मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याचा मोठा दावा करण्यात आलाय. दाऊदवर विषप्रयोग झाला असून तो अत्यावस्थेत आहे, असे पाकच्या पत्रकार आरजू काझमी यांनी म्हटलंय. यावरून एक बाब स्पष्ट झाली की भारताचा नंबर १ चा शत्रू दाऊद पाकिस्तानाच आहे. विष प्रयोगानंतर त्याच्यावर पाकिस्तानातच उपचार सुरू आहे, असं पत्रकार आरजू काझमींचं म्हणणं आहे. पण दाऊद विष प्रयोग केला कोणी? तर पहिली शंका पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआयवर आहे. ही तीच गुप्तचर यंत्रणा आहे, ज्याद्वारे पाकचं सरकार भारतविरोधात स्वतःच दहशतवादी घटना घडवते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 18, 2023 10:05 PM
अरे काय चाललंय? जरांगे पाटील कितवी पास आहे? गुणरत्न सदावर्ते भडकले अन्…
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचं काल लोकार्पण आणि आज तोडफोड, नेमकं काय घडलं?