‘माझ्या बाळाला फक्त बोलता यावं…’, एकनाथ शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच माऊलीला अश्रू अनावर

| Updated on: Mar 25, 2025 | 5:15 PM

सातारा जिल्ह्यातील पातेपूर या गावातील अक्षय चव्हाण आपल्या पत्नीसोबत मजुरी करत असतात. त्याना तीन वर्षाचा निलेश नावाचा मुलगा आहे. मात्र या मुलाला एकता आणि बोलता येत नाही. त्याच्या वैद्यकीय उपाचारासाठी शिंदेंनी पुढाकार घेतलाय.

पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षांच्या चिमूकल्याला चक्क भर उन्हात दगडाला बांधून ठेवत मजुरी करत असल्याचा व्हिडीओ काल व्हायरल झाला. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधला दानवली या दुर्गम खेडेगावातील हा व्हिडीओ असून एकनाथ शिंदेंनी याची दखल घेतली आणि 24 तासांच्या आत सातारा जिल्ह्यातून त्या लहानग्या मुलाला आणि त्याच्या पालकाला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. या मुलाचा सर्व वैद्यकीय खर्च करण्यासही शिंदेंनी पुढाकार घेतला आहे. शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि सहाय्यक भरत गोपाळे यांनी या मुलाची आणि त्याच्या पालकांची ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांशी भेट घालून दिली आहे. याप्रसंगी त्या चिमुकल्याच्या आईशी टीव्ही ९ ने संवाद साधला असता त्यांना भावना अनावर झाल्यात. ‘माझं बाळ बोलावं ही एकच इच्छा आहे. माझ्या बाळासाठी रात्र-दिवस आम्ही इतके कष्ट करतोय.’, असं म्हणत पोटच्या मुलासाठी आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. तर ‘भविष्यात माझा मुलगा मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभा राहावा असं वाटतं, बाकी काही इच्छा नाही. पण त्याने मोठेपणी पोलीस व्हावं असं वाटतं’, असं निलेशच्या आईने सांगितले.

Published on: Mar 25, 2025 05:15 PM
Satish Salian : माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशा सालियानच्या वडिलांचं मोठं विधान
Shivsena UBT : मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व; ठाकरेंची शिवसेना आक्रमक