सना खान यांच्या आईनं व्यक्त केली अपेक्षा; म्हणाल्या, ‘छोटा आरोपी किंवा कोणी आमदार असो खासदार असो..’
VIDEO | नागपुरात राहणाऱ्या भाजप नेत्या सना खान या २ ऑगस्ट २०२३ रोजी बेपत्ता अन् त्यांची झाली हत्या, 'छोटा आरोपी किंवा कोणी आमदार असो खासदार असो किंवा कोणीही असेल ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे', सना खान यांच्या आईनं व्यक्त केली अपेक्षा
मुंबई, 23 ऑगस्ट 2023 | नागपुरातील भाजप नेत्या सना खान उर्फ हिना खान हत्या प्रकरणात नव नवे खुलासे समोर येत आहेत. याचदरम्यान आता सना खान आणि गुन्हेगार अमित साहू हे हनीट्रॅप चालवत होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. तर त्यात अनेक राजकीय नेते अडकल्याचेही कळत आहे. तर याप्रकरणी आता पोलिसांनी आपली मोर्चा मध्यप्रदेशकडे वळवला असून येथील राजकीय नेते हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. अशातच सना खान यांच्या आईने टिव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ‘डीसीपी यांनी मला आज पहिल्यांदाच काही माहितीसाठी बोलावलेलं होतं त्यासाठी मी आज डीसीपी ऑफिसला आली होती आणि भेटले. सगळ्या विषयावर या ठिकाणी चर्चा झाली मी फिर्यादी आहे. मध्य प्रदेशातल्या आमदाराला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांना मी ओळखत नाही, त्यांना काय विचारलं गेलं हे पण मला माहित नाही मात्र या केसमध्ये छोट्यातला छोटा आरोपी किंवा कोणी आमदार असो खासदार असो किंवा कोणीही असेल ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला सजा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे.’