VIDEO : Pankaja Munde यांना उमेदवारी न दिल्याने टरबूज फोडून आंदोलन
विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने उभ्या केलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले नाहीये. यावरून विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्येच परभणी जिल्हातील गंगाखेडमध्ये ताई नाही तर भाजप नाही...अशा घोषणा देत टरबूज फोडत एक अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्त्य जमले होते. पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे सध्या मोठा संताप त्यांच्या समर्थकांमध्ये बघायला मिळतो आहे. त
विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने उभ्या केलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले नाहीये. यावरून विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्येच परभणी जिल्हातील गंगाखेडमध्ये ताई नाही तर भाजप नाही…अशा घोषणा देत टरबूज फोडत एक अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्त्य जमले होते. पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे सध्या मोठा संताप त्यांच्या समर्थकांमध्ये बघायला मिळतो आहे. तर विविध राजकीय पक्षांनीही या निर्णयामागे नक्की कुणाचा तरी हात आहे, असा आरोप केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी न देण्यावरून प्रतिक्रिया दिली. आजच्या दैनिक सामनामध्ये त्यांनी मुंडे कुटुंबियांची होणारी उपेक्षा यावर भाष्य केलं आहे.