शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभा लढवणार? अमोल कोल्हे म्हणाले, … तर त्यांना माझ्या शुभेच्छा
महाविकास आघाडीकडून खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित असलं तरी महायुतीकडून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये या जागेसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दावा ठोकला आहे
शिरूर, १९ फेब्रुवारी २०२४ : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार निवडणूक लढवणार? या चर्चांना उधाण आलं आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीकडून खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित असलं तरी महायुतीकडून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये या जागेसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दावा ठोकला आहे. असे असताना अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा लढवण्याच्या शुभेच्छा दिल्यात. इतकंच नाही तर तगडा उमेदवार समोर असला की लढतीत रंगत येईल, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे पद चार वर्ष रिक्त होतं ते निवडणुकीच्या तोंडावर दिल्याने चर्चांना उधाण येऊ शकंत. मात्र त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर त्यांना माझ्या शुभेच्छा…