देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल; स्पष्टच म्हणाले, मिठाचा खडा टाकण्यापेक्षा…

| Updated on: Dec 17, 2023 | 1:26 PM

दोषारोप करण्यापेक्षा आता तुमचे सरकार आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे केली पाहिजे. बिहार सारखे राज्य करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करत खोचक टीकाही सरकारवर केली आहे.

पुणे, १७ डिसेंबर २०२३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाती-जातीमध्ये कलगीतुरा लावण्याचे काम हे थांबवायला हवे, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले तर दोषारोप करण्यापेक्षा आता तुमचे सरकार आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे केली पाहिजे. बिहार सारखे राज्य करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करत खोचक टीकाही सरकारवर केली आहे. तर अठरा पगड जातीचा समाज एकत्र नांदत होता. मात्र आता काही विधानं करून मिठाचा खडा टाकण्यापेक्षा जात निहाय जनगणनेची मागणी पुढं आणावी, अशी मागणीही यावेळी अमोल कोल्हे यांनी केली. यासह मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण दिलं पाहिजे. केवळ महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नापासून विचलित करण्यासाठी वेगळं विधान देवेंद्र फडणवीस करत आहेत हे थांबवायला हवे. ५० पेक्षा अधिक वर्ष महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मराठा समाजाची आरक्षणची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही कोल्हे म्हणाले.

Published on: Dec 17, 2023 01:26 PM
लग्नाचं गुपीत? प्रयेसीच्या अंगावर घातली गाडी, भाजप पदाधिकारी अडचणीत? प्रकरण नेमकं काय?
बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे ? ‘त्या’ पत्रावर बोलताना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?