‘एवढा अपमान आणि शिवसैनिकांना काहीच वाटले नाही’, अनिल बोंडे यांचा थेट सवाल
VIDEO | तर कुणी डोळा मारू शकलं असतं का? खासदार अनिल बोंडे यांचा विरोधकांना खडसावताना थेट सवाल, बघा नेमंक काय म्हणाले?
नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे अर्थसंकल्पावर बोलत असताना उद्धव ठाकरे आले. त्यावेळी उद्धव साहेब बोलतील, असं म्हणून अजित पवार बाजूला झाले. त्यानंतर त्यांनी एक कार्यकर्त्याकडं पाहून डोळा मारला होता. यावर बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, विरोधकांनासुद्धा या बजेटबद्दल चांगलं बोलावं लागलं. अजितदादा यांना डोळा मारावं लागला. देशात आता डोळा मारणारे दोन जण झालेत. एक अजितदादा आणि दुसरे राहुल गांधी. अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार डोळा मारतात. एवढा अपमान झाला आणि शिवसैनिकांना काहीच वाटले नाही. जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असले तर कुणी डोळा मारू शकलं असतं का? असा सवालही अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. तर मी पण शिवसैनिक होतो, असं अनिल बोंडे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Published on: Mar 12, 2023 03:13 PM