“शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन्…”, कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यानं नवा वाद

| Updated on: Aug 26, 2024 | 4:37 PM

काही महिन्यांपूर्वी कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनावर एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले होते. त्यानतंर आता पुन्हा एकदा कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याचा आरोप कंगना यांनी केला आहे

शेतकरी आंदोलनावरून  बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनात महिलांवर बलात्कार झाल्याचे वक्तव्य कंगना रणौत यांनी केले आहे. नुकतंच कंगना रणौत यांनी दैनिक भास्कर या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगना यांनी शेतकरी आंदोलनावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बांगलादेशात जे झालं ते महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होतं, ते सर्वांनी बघितलं आहे. निषेध करण्याच्या नावाखाली हिंसाचार पसरवला गेला, आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, महिलांवर अत्याचार झाले. पण केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला. कारण त्यांची खूप मोठी प्लॅनिंग होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते, असे कंगना रणौत यांनी म्हटले. कंगना रणौत यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यात आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देत वादग्रस्त महिला वादग्रस्त वक्तव्य करणार असं म्हटलंय. तर कंगना रणौतला फार गांभीर्याने घेऊ नये, कंगना रणौतच्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असे संजय राऊत यांनी म्हटलंय.

Published on: Aug 26, 2024 04:37 PM