Kapil Patil LIVE | मला मनापासून आंनद झाला, कपिल पाटील पंचायत राज्य राज्यमंत्री
कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. तसेच मला मनापासून आनंद झाला आहे अशी प्रतिक्रियाही दिली. पाटील यांना कॅबिनेट राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियासह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.