Kapil Patil | भाजपने जो सन्मान दिला त्यासाठी कृतज्ञ, देशाची सेवा करण्याची संधी मिळाली : कपिल पाटील
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे (MP Kapil Patil first reaction after taking oath as minister).
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी आभार व्यक्त करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं आवर्जून नाव घेतलं (MP Kapil Patil first reaction after taking oath as minister).