नवनीत राणा आणि रवी राणा यांचा व्हॅलेंटाईन डे, बघा सेलिब्रेशनचा अनोखा व्हिडीओ

| Updated on: Feb 14, 2023 | 4:00 PM

VIDEO | खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणांनी साजरा केला अनोखा व्हॅलेटाईन डे

अमरावती : खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज व्हॅलेंटाईन डे साजरा केला. विशेष या दोघांचा प्रेमविवाह झाल्याने त्यांनी आज त्यांच्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना कॉफी सेंटरमध्ये बोलावलं. त्याठिकाणी दोघांनीही एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. त्यानंतर दोघांनीही कॉफी घेतली. यावेळी राणा दाम्पत्यांनी तरुण-तरुणींना सल्ला दिला. नवनीत राणा यांची नाराजी मी कॉफीने दूर केली, असे रवी राणा म्हणाले. आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं या दोघांनी एकत्र येण्याचे ठरविले. आज हेच दाम्पत्य कॉफी हाऊसमध्ये भेटले. त्या दोघांनी एकमेकांना व्हॅलेटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. एकत्र कॉफी घेत व्हॅलेटाईन डे साजरा केला. एकमेकांना गुलाबाचे फूल भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Published on: Feb 14, 2023 04:00 PM
पालकांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला, काय झाली चर्चा?
देवेंद्र फडणवीस बोलले तो गौप्यस्फोट नव्हे तर…; रोहित पवार यांचा जोरदार पलटवार