सुषमा अंधारे यांना ओळखत नाही अन्…, नवनीत राणा यांनी काय लगावला खोचक टोला; बघा व्हिडीओ
VIDEO | सुषमा अंधारे विरुद्ध नवनीत राणा वाद पेटणार? सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर काय म्हणाल्या नवनीत राणा?
अमरावती : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रावरून टीका केली होती. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, मी अमरावतीला मार्च महिन्यात येणार व नवनीत आक्काची भेट घेणार. यावर खासदार नवनीत राणा यांनी सुषमा अंधारे यांना टोला लगावला आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी मी नाही, जी गोष्ट कोर्टात आहे त्यावर बोलण्याचा अधिकार सुषमा अंधारे यांना नाही तर सुषमा अंधारे या काही जज नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. तर मी त्यांना ओळखत नाही, रोज फिरणाऱ्या लोकांबद्दल मी काही उत्तर देऊ शकत नाही असा टोला त्यांनी सुषमा अंधारे यांना लगावला आहे. यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे विरुद्ध नवनीत राणा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 21, 2023 06:37 PM