त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नव्हती – खासदार नवनीत राणा
ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला अन्याय तर माझ्यावर झाला आहे. तरी मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. मी जेलमध्ये गेले होते संजय राऊत नाही. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत .
नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या (Sanjay Raut) भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले. नवनीत राणा म्हणाल्या, मला वाटतं माझी लढाई हे माझे विचार आहेत. ते महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासासाठी आहेत. ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला अन्याय तर माझ्यावर झाला आहे. तरी मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. मी जेलमध्ये गेले होते संजय राऊत नाही. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत .
Published on: May 20, 2022 06:56 PM