अन् तुरूंगातील तो अनुभव सांगताना नवनीत राणा भर कार्यक्रमात रडल्या

| Updated on: Apr 06, 2023 | 4:01 PM

VIDEO | तुरूंगातील तो अनुभव सांगताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर, पोलिसांना देखील माझं दुःख बघावलं नाही अन् ते म्हणाले...

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज हनुमान चालिसा पठण केलं. हनुमान जयंतीनिमित्त नवनीत राणा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मागच्या वर्षी तुरूंगात असतानाचे अनुभव सांगितले. हनुमान जन्मोत्सव निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी 21 वेळा हनुमान चालीसा पठण केले यावेळी त्यांनी तुरुंगातील काही आठवणी शेअर करत त्या भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे अत्याचारी मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गाडले. अटक झालेला प्रसंग सांगताना नवनीत यांना आश्रू अनावर झाले. त्यामुळे लढणं काय असतं ते बाळासाहेबांनी शिकवलं. देशद्रोहाच्या गुन्हाखाली झालेली अटक सहन करण्यासारखी नव्हती. माझ्या अटकेच्यावेळी पोलिसही भावुक झाले. मी आता रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी तयार आहे. ते मला तोडू शकले नाही जेलमध्ये प्रत्येक दिवशी मी 101 वेळा हनुमान चालीसा पठण केल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Apr 06, 2023 03:55 PM
पुण्यात लशींचा तुटवडा, लसीकरण केंद्र बंद; पुन्हा कधी सुरू होणार? पाहा…
लोक संजय राऊत यांच्याकडे फक्त…; गिरीश महाजन यांचं जोरदार टीकास्त्र