मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून विरोधकांनी घेरलं, काय केला हल्लाबोल?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तुफान व्हायरल होणाऱ्या 'त्या' व्हिडीओवरून विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि विजय वडेट्टीवार यांनी काय केली टीका?
मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडीओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडीओ आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हिडीओवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तुफान व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ व्हिडीओवरून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. नाकर्ते सरकार राज्याचा कारभार राज्याचा कारभार हाकत आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत टीका केली आहे तर मराठा आरक्षणावर सरकारची अनास्था दर्शवणारा हा व्हिडीओ असल्याचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.