“महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला अर्थसंकल्प”; ‘या’ नेत्यानं अर्थसंकल्पाचं केलं तोंडभरून कौतूक
VIDEO | 'या' नेत्यानं अर्थसंकल्पाचं तोंडभरून कौतूक करत देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सोलापूर : महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प असून सर्व स्तराची उन्नती करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्याचादेखील विचार करण्यात आला असल्याचे सांगत त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. नांदेड ते बिदर या रेल्वे मार्गाची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नांदेड आणि बिदर हे दोन तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासन 6 हजार रुपये देणार असून सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगत अर्थसंकल्पाचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
Published on: Mar 09, 2023 11:04 PM