Breaking | मुख्यमंत्र्यांकडे 5 मागण्या केल्यात, सीएमसोबत चर्चा सकारात्मक होईल ही अपेक्षा :संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समन्वयकांसोबत भेटणार असल्याचं सांगितलं. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांना भेटणार असलो तरी याआधीच पाच मागण्या त्यांना सांगितल्या असल्याचंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समन्वयकांसोबत भेटणार असल्याचं सांगितलं. चर्चा सकारात्मक होईल असा विश्वास संभाजीराजेंनी वर्तवला. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटणार असलो तरी य़ाधीच महत्त्वाच्या 5 मागण्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं संभाजीराजेनी सांगितलं.