मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
मनसे आणि भाजप यांची महायुती होणार असल्याची चांगलीच चर्चा सध्य़ा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मुंबई, १९ मार्च २०२४ : मनसे आणि भाजप यांची महायुती होणार असल्याची चांगलीच चर्चा सध्य़ा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आधी शिवसेना फोडली तरी काही फायदा झाला नाही. उद्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कायम राहील. त्यामुळे आता शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पाडून गोंधळ करून पदरात पाडून घेता येईल का? याची कारस्थान दिल्लीत सुरु आहेत.’ असे संजय राऊत यांनी म्हटले. तर MIM पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रात असतील, ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसंदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी-शाहांना मदत करु इच्छित असतील, तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची, पक्षांची भूमिका महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहीली जाईल,असा हल्लाबोलही राऊतांनी चढवलाय.