अफजलखान ते औरंगजेब, संजय राऊत यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक; राजकीय वातावरण तापलं
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. बुलढाण्यातील एका सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. इतकंच नाहीतर २०१४ च्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना अफजलखानाशी केली होती
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. यापूर्वी २०१४ साली उद्धव ठाकरे यांनी अफजल खानावरून टीका केली होती. आता प्रचारात औरंगजेब याची एन्ट्री झाली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेब यांच्याशी केल्याने भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असून निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आणि कारवाईची मागणी केली. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. बुलढाण्यातील एका सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. इतकंच नाहीतर २०१४ च्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना अफजलखानाशी केली होती तर आता २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, संजय राऊत हे औरंगजेबापर्यंत येऊन पोहोचले आहेत. बघा संजय राऊत यांनी नेमका काय केला हल्लाबोल?