आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता…, महायुती सरकारवर संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 05, 2023 | 12:49 PM

लग्न दोघांत झालं होतं आता ते तिघात झालं आहे. त्यामुळे ते टिकत नसतं… हे दोघात व्हायला हवं होतं… आम्ही महविकास आघाडी म्हणून एकत्र होतो. पण आमचं उत्तम सुरू होतं. गेल्या ३० वर्षांपूर्वी भाजपला राज्यात पोस्टर चिकटवायला माणसं नव्हती, संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : २०२४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं इतकंच नाही तर त्यांनी वानखेडेवर शपथ विधी सोहळा होईल, असेही म्हटले. या वक्तव्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अजित पवार, भाजपने सांगायला पाहिजे. हे लग्न दोघांत झालं होतं आता ते तिघात झालं आहे. त्यामुळे ते टिकत नसतं… हे दोघात व्हायला हवं होतं… आम्ही महविकास आघाडी म्हणून एकत्र होतो. पण आमचं उत्तम सुरू होतं. गेल्या ३० वर्षांपूर्वी भाजपला राज्यात पोस्टर चिकटवायला माणसं नव्हती, अशावेळी भाजपचं काहीच नव्हतं तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन शिवसेनेने गावागावात पोहोचवलं. असं संजय राऊत म्हणाले. तर शिवसेनेचे भाजपला वाढवलं, हे सांगायची कोणत्या पंडितांची गरज नसल्याचेही त्यांनी म्हणत खोचक टोलाही लगावला.

Published on: Dec 05, 2023 12:49 PM
2024 ला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडे यांचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी दूर? ‘शासन आपल्या दारी’त होणार सहभागी?