उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार? संजय राऊत यांनी काय दिले संकेत?

| Updated on: Mar 06, 2023 | 8:03 PM

VIDEO | उद्धव ठाकरे भविष्यात राष्ट्रीय राजकारणात दिसणार का? या प्रश्नावर उत्तर देत असतांना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान, बघा व्हिडीओ

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर भेट घेतली होती. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी एकत्र येण्याची सुरुवात झाली असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधणं गरजेची असून त्यासाठी शिवसेने पुढाकार घेण्यास सुरूवात केली असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे चर्चा होती. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले आहे की, आम्ही सर्वांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येऊन विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सांगितलं आहे. त्याबाबत ते लवकरच विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Mar 06, 2023 08:03 PM
दुर्दैव आमच्यावर औरंगजेब आणि जिल्ह्याचं नवीन नाव थोपलं जात आहे : जलील
जय बेळगाव जय कर्नाटक विधानावर राजकिय वादंग; धीरज देशमुख यांनी व्यक्त केली दिलगिरी